Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

मंदिराबद्दल माहिती

 

आपल्या सर्वांना सांगताना फार आनंद होत आहे कि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ओरी हे सुंदर गाव वसलेले आहे. या गावाच्या सर्व रहिवाश्यांच्या सहकार्याने प्राचीन पवित्र मंदिर श्री देव केदारलिंग, श्री महालक्ष्मी , श्री त्रीमुखीदेवी आणि पंचमुखीदेवीच्या डागडुजीचा आणि नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे .

 

सर्व भक्त आणि पर्यटक यांची दीर्घ काळापासून मागणी होती कि या पवित्र मंदिराला शिल्पकाराच्या सहकार्याने एक सुंदर वास्तुत परिवर्तीत करण्यात यावी.

 

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे मंदिराचे नुतनीकरण १२५ वर्षाआधी करण्यात आले त्यानंतर छोट्या प्रमाणात डागडुजीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी अधिक स्थानिक लोकांनी हातभार लावून काम केले होते.

केदारलिंग
श्री त्रीमुखीदेवी
पंचमुखीदेवी
भगवती देवी

 

पण आता मंदिराचे नुतनीकरण करणे  गरजेचे आहे आणि मंदिराचे बांधकाम भक्कम करण्यासाठी आर.सी. सी. पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे मंदिराचे नुतनीकरण १२५ वर्षाआधी करण्यात आले त्यानंतर छोट्या प्रमाणात डागडुजीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी अधिक स्थानिक लोकांनी हातभार लावून काम केले होते. पण आता मंदिराचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे आणि मंदिराचे बांधकाम भक्कम करण्यासाठी आर.सी. सी. पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री त्रीमुखीदेवी सर्व भक्तांची आणि स्थानिक लोकांची कुलदैवत आहे. सर्वांचा विश्वास आहे कि देवी त्रिमुखी त्यांची तक्रार ऐकते आणि त्यांची संकटे दुर करते. सर्व भक्तांचा दृढ विश्वास आहे कि जो भक्त देवीचा नवस करतो देवी त्याची सर्व संकटे दूर करते.

 

सर्व मंडळी गावातील वार्षिक विधी आणि सण एकत्र येऊन भरपूर आनंदाने साजरे करतात. होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यादिवशी सर्व मंडळी गावात एकत्र येऊन सणाचा आनंद लुटतात. गाव आणि मंदिरासंबंधी दिलेल्या सुचना माहिती आणि विनंतीचे स्वागत करतो ज्यामुळे या कार्याला मदत होईल.

मंदिराच्या नुतनीकरणाच्या सढळ हाताने मदत करा यासाठी आम्हाला संपर्क करा.

 

नुतनीकरन समितीचे अध्यक्ष , श्री देव केदारलिंग महालक्ष्मी त्रिमुखी देवस्थान पी.ओरी तालुका रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्र

 

सढळ हाताने
मदत करा
संपर्क करा

मोबाईल: 91-09221916757

ईमेल :enquiry@trimukhidevi.com

कॉपीराईट २०१२ त्रीमुखीदेवी.कॉम

डोनेट : निशा विजय देसाई

भाषा निवडा : इंग्रजी  •  मराठी